दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर. तालुका आहे कर्नाटक व तेलंगाना या राज्याच्या सीमेवरती वसले असून राज्यातून मोठ्या प्रमाणावर दळणवळणाची व माल वाहतुकीचे गाड्या मोठ्या प्रमाणावर चालत असतात. याच दरम्यान देगलूर तालुक्यातील वझरगा येथे 30 जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास देगलूर पोलीसांनी प्रतिबंधित गुटका व तंबाखूजन्य पदार्थांचे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जनांवर कारवाई केले असून, एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. ही कारवाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती नंतर तात्काळ कृती करत केली. या कारवाईत शेख साजिद, शेख जलाल बागवान वय (३८) शेख अख्तर शेख,शेख गफार बागवान (दोघेही रा.सदर बाजार,जामा मस्जिद जवळ हिंगोली)या दोन आरोपींना अटक करण्यात आली.हे दोघे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर MH.12.KN 6039 कारमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचे वाहतूक करत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी वझरगा येथे सापळा रचून संबंधित कार अडवून तपासणी केली असता,मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी जप्त केल्या मुद्देमाल पुढील वस्तूंचा समावेश आहे.
विमल केसरी,पान मसाला,रजनीगंधा मसाला, सिग्नेचर पान मसाला असे एकूण अंदाजे ९,२०,४०९रुपयांचे एकूण माल जप्त केली असून, वाहतूक करणारी गाडी स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाचीची होती. याप्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील कृष्णा तलवारे,साहेबराव सगरोळीकर ,वैजनाथ मोटारगे,राजवंत सिंग बूगंई व रणजीत मुदिराज यांनी संयुक्तपणे केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसण्याची आशा नागरिकांनी करत आहे व तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वतोपरी कौतुक करत आहेत.
