म्हणतं ठाकरे बंधुंची निमंत्रण पत्रिका व्हायरल…
त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर ५ जुलै रोजी विजय मेळावा साजरा करण्यात येणार आहे. या मिळाव्याची राज्यभर चर्चा असताना मुंबईत दादर परिसरात विजयी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेचे बॅनर झळकलेत .
यात ‘सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! ‘ अशा आशयाची महायुतीच्या जखमेवर मीठ चोळणारी टीका ठाकरे बंधूंनी केली आहे. तर विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत महायुतीवर बोचक टीका करत म्हणाले,’ आवाज मराठीचा…असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं…आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या विजयी मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून, या मोर्चेची जबाबदारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब,वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून एनएससीआयची पाहणी करण्यात येणार आहे.
त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर ५ जुलै रोजी विजय मेळावा साजरा करण्यात येणार आहे. या मिळाव्याची राज्यभर चर्चा असताना मुंबईत दादर परिसरात विजयी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेचे बॅनर झळकलेत . यात ‘सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! ‘ अशा आशयाची महायुतीच्या जखमेवर मीठ चोळणारी टीका ठाकरे बंधूंनी केली आहे. तर विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
‘सरकारला नमवलं का ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत महायुतीवर बोचक टीका करत म्हणाले,’ आवाज मराठीचा…असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं…आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधू :