
कोंढवा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; सर्वच हादरले !
मुंबईत महिला शिक्षिकेने वर्षभर एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली होती. या कांडावरून सुरू झालेला गदारोळ अद्याप शांत झालेला नसतानाच विद्येचे माहेर, सुसंस्कृतांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात आणखीनच एक भयाक प्रकार घडला.
कोंढवा भागातील एका पॉश सोसायटीमध्ये कुरिअर बॉय बनून शिरलेल्या तरूणाने त्या सोसायटीतील 22 वर्षीय तरूणीच्या तोंडावर स्प्रे मारला आणि तिच्यावर अत्याचार केला. बुधवारी संध्याकाळी हा घृणास्पद गुन्हा घडला असून कोंढवा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
हे प्रकरण उघड झाल्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. स्थानिक पोलिसही कारवाईला आले. आरोपी कुरियर बॉयच्या वेशात पॉश कॉलनीत घुसला. पीडितेने दरवाजा उघडताच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारण्यात आला. पीडितेला काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे.
पॉश सोसायटीतील अत्याचाराने हादरले पुणेकर
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका पॉश कॉलनीत ही खळबळजनक बलात्काराची घटना घडली आहे. शहरातील कोंढवा परिसरातील एका पॉश सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षीय मुलीसोबत क्रूरतेची ही घटना झाल्याचे उघडकीस आले.
पीडित तरूणीसोबत तिचा भाऊही राहतो. मात्र घटनेच्या दिवशी तो गावी गेला असल्याने पीडित महिला घरात एकटीच होती. हीच संधी आरोपीने साधली, आणि महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून करून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बुधवारी (2 जुलै 2025 ) संध्याकाळी ७:३० वाजता घडली. कुरिअर बॉय म्हणून ओळख करून देत आरोपीने सोसायटीत प्रवेश केला. तो पीडितेच्या घरी गेला आणि कुरिअर आल्याचे तिला सांगितलं. मात्र हे माझं कुरिअर नाही असं तरूणीने सांगितल्यानंतरही आरोपीने सांगितले की तिला त्यावर सही करावी लागेल. यावर महिलेने सेफ्टी डोअर उघडले असता आरोपीने डाव साधला आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. मुलीला काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि बलात्कार केला.
मै वापस आऊंगा… सेल्फी काढत धमकीचा लिहीला मेसेज
त्या तरूणीवर बलात्कार करणाऱ्या त्या बोगस कुरिअर बॉयचे हे कारनामे ऐकून सामान्य नागरिकांसह पोलिसही हादरले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, त्या तरूणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेचा मोबाईल घेत, त्यामध्ये सेल्फी काढल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेचा पाठीवर झोपून सेल्फी काढला. त्यानंतर त्याने त्याच मोबाईल मध्ये’मी परत येईन’ असा मेसेज टाइप केला. एवढंच नव्हे तर या घडलेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली मी हे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही आरोपीने त्या तरूणीला दिली.
याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची 5 आणि पोलिसांची 5 अशी 10 पथकं आरोपीच्या मागवर असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली. तसेच, कुरिअर बॉय बनून आलेला तो आरोपी नेमका कोण होता आणि तो पीडितेला कसा ओळखत होता हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, पॉश सोसायटीमध्ये आणि आजूबाजूला बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही ताब्यात घेण्यात आलं असून त्याचीही तपासणी सुरू आहे.स्कॅन केले जातील जेणेकरून आरोपीची ओळख पटेल.