
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आर्वी – : माजी मुख्यमंत्री, तथा हरितक्रांतीचे प्रेनेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती आर्वी येथील शिवाजी चौक येथे साजरी करण्यात आली व त्यात बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोर सेना वर्धा येथील पदाधिकारी व इतर मान्यवर हजर होते गोर सेना शिदवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे सदगरु सेवालाल महाराजांचे फोटो, वृक्षांचे रोपटे व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश राठोड़ गोर शिकवाड़ी सहसंयोजक भारत, आर्वी पोलिस स्टेशनचे जेष्ठ पोलिस जाधव, ज्ञानेश्वर राठोड़ गोर सेना नागपुर विभागीय अध्यक्ष, संजय जाधव गोर सेना जिल्हा संघटक वर्धा,निखिल राठोड़ वर्धा कैलाश जाधव गोर सेना तालुका अध्यक्ष आर्वी,बादल राठोड़ तालुका सचिव, गिरधर पवार, राजू जाधव, साहेबराव अवथडे, सुनील बंड किशोर राठोड़, रविन्द्र राठोड़,संजय राठोड फुलचंद मुचाल, शेकलाल जाधव, योगेश राठोड़ राजेश जाधव, हरीश जाधव व आर्वी तालुक्यातील संपूर्ण तांड्याचे नायक व गोर सैनिक उपस्थित होते.