
संजय राऊत कडाडले; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये मराठीचा विजय मेळावा (Marathi Vijayi Melava) पार पडतोय. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. या विजयी मेळ्यापूर्वीच संजय राऊतांनी असं विधान केलंय.
दोन भाऊ मंचावर एकत्र…
यावेळी बोलताना राऊत यांनी म्हटलंय की, विजय सोहळा आहे. मराठी भाषेसंदर्भात हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे. आम्ही संघर्ष केला, सरकारने माघार घेतली. मोर्चाचे रूपांतर मेळाव्यात झाले. पाऊस असल्याने वरळी डोम येथे मेळावा घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. लोक पोहोचण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मराठी जनतेला दोन भाऊ मंचावर एकत्र येऊन, मराठी माणसाला आणि (Maharashtra Politics) महाराष्ट्राला दिशा मार्गदर्शन करणार. ती दृश्य महाराष्ट्राला पाहता यावी. इतर कोणताही कार्यक्रम इथे नाही राज्य गीत, कोळी बांधवांचा बँड, पथक वारली, कोळीवाडा संस्कृतीच दर्शन होणार, असंही राऊतांनी स्पष्ट केलंय.
मराठी माणसाचा अपमान
ज्या संघर्षातून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, त्याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा. आम्ही जी गुंडगिरी केली, त्यामुळेच तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहात, असा टोला यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. अनेक गुन्हे दाखल केले. बेळगावात आम्ही गेलो, तुम्ही नाही. बडोदामध्ये गायकवाड यांची संस्था आहे. होळकर यांच्यासारखे अनेक संस्था उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात आहेत. पण तिथे जय मध्यप्रदेश आणि योगी पण जय उत्तर प्रदेश असेच म्हणतात.फडणवीस हे शिंदे यांना अडचणीत आणत आहेत. तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात. शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, आणि फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतल्याने, त्यांनी पण माफी मागायला हवी. हो, आम्ही मराठीसाठी गुंड आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांनी सांगितले की हजारो लोकांना येण्यासाठी आमंत्रण देण्यात येईल. राज्यगीत, कोळी बांधवांचा बँड आणि कोळीवाडा संस्कृती यांचा रंगभूमीवर समावेश असेल. मंचावर प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाचे आमंत्रण असेल. सभेचा प्रसार सभागृहाबाहेर मोठ्या पडद्याद्वारे, हाजी अली रोडपर्यंत दिसेल, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.