
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर घुगे व शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रमाची अंमलबजावणी….)
=============
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील विद्यावर्धिनी विद्यालयामध्ये आज आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पर्यावरण वाचवण्यासाठी पाऊल उचलत जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा हा संदेश दिला
तसेच मराठी माणसाच्या विशेष करून महाराष्ट्राच्या पारंपारिक पोशाखात सहभागी होऊन संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. विद्यार्थी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात शाळा परिसरात दिंडीसह फिरले. ढोल-ताशांच्या गजरात आणि अभंगगायनाच्या सुरात सर्व वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगणारे नाट्यप्रयोग, भाषणे आणि गीत-नृत्य सादर केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रमुख प्रा. शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा सिद्धेश्वरे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व सांगितले
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, भक्तीभाव आणि एकात्मतेचे दर्शन घडले.
विद्यावर्धिनी विद्यालयाने पुन्हा एकदा सांस्कृतिक जाणीव आणि पारंपरिक मूल्यांची सुंदर सांगड घालून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अध्यात्माची ज्योत पेटवली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अर्चना माने, प्रज्ञा नळेगावकर, अमृता कुलकर्णी यशोदा अमृतवार यांचे सहकार्य लाभले .