
धसांचाच मुलगा चालवत होता गाडी; 19 तासांपासून पोलिसांच्या ताब्यात…
अहिल्यानगर-पुणे रोडवरील जातेगाव शिवार (ता. पारनेर) इथं झालेल्या अपघातात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हा अपघात बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाने झाले आहे.
जातेगाव फाट्यावर झालेल्या अपघाताच्या काही क्षणात आम्हाला माहिती मिळाल्याचा दावा सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी केला. त्यावेळी ते शिरूरवरून येत होते. अपघात होताच, काही क्षणात तिथं अपघातस्थळी पोचल्याचा दावा केला. अपघातानंतर लगेच सागर धस याला ताब्यात घेण्यात आले.
अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस(Suresh Dhas)(रा. आष्टी, बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी. जि.बीड) हे दोघे जण होते. दुचाकीस्वाराला सागर याच्या वाहनाकडून मागून धडक बसली.
सुपा पोलिसांनी सागर धस याच्याकडील वाहन ताब्यात घेतलं असून, वाहनाचा चालकाकडील भागाचे आणि दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाहनाची नंबर प्लेट देखील वाकलेली होती. यावरून धडक जोराची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सागरला धस नोटिस बजावून सोडणार
अपघातानंतर लगेचच सागर धस याला ताब्यात घेण्यात आलं. सागर धस गेल्या 19 तासांपासून ताब्यात आहे. अपघाताचे नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण सागर हाच वाहन चालवत होता. त्याला नोटिस बजावून आता सोडले जाणार असल्याचे, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले.