
दिवस गेलेल्या गर्लफ्रेंडला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी…
शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारिरिक संबंध ठेवले, यातून ती गर्भवती राहिल्याने तिच्या नकळत रबडीतून गर्भपाताची गोळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आदर्श वाल्मिक मेश्राम या 28 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला मित्र, तक्रार बनावट असल्याचा पोलिसांचा खुलासा
नेमकं प्रकरण काय?
पीडित तरूणी आणि आरोपी मेश्राम हे एकमेकांना कॉलेजपासून परिचित असून, दोघांमध्येही 2018 पासून संबंध होते. याकाळात आरोपीने पीडित तरूणीला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शाररिक संबंध ठेवले. मात्र, ज्यावेळी पीडित तरूणी गर्भवती राहिल्याचे आदर्शला कळाले तेव्हा त्याने लग्नास नकार दिला.
रबडीतून दिली गर्भपाताची गोळी
दरम्यान, आदर्श मेश्राम याचा वाढदिवस असल्याने कारणाने पीडित तरूणी यवतमाळहून पुण्यात आली होती. यावेळी आदर्शने रबडी मागवली होती. मात्र, यात आरोपीने गर्भपाताची गोळी मिसळली होती. त्यानंतर काहीवेळातच पीडितेचा गर्भपात झाल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग, मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र
मोबाईलमधून उघड पडलं सर्व पितळ
पीडित तरुणीने आदर्शच्या जुन्या प्रेयसीशी संपर्क साधल्यावर, तिच्याही बाबतीत अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आदर्शने लग्नाचे आमिष दाखवून तिचेही लैंगिक शोषणही केले होते, अशी माहिती त्याच्या जुन्या प्रेयसीने दिली.
त्यानंतर 3 जुलै रोजी आदर्शने रबडीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिसळून पीडितेला खायला दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 376 (बलात्कार), कलम 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?
वाढत्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही वर्षांपासू सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.