दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये
शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसून प्रवेश फीसच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शासन निर्णय झुगारून अव्वाच्या सव्वा फीस वसुली करत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मंठा येथून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाकडून विनाअनुदानित असल्याचे कारण सांगून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या आवाक्या बाहेरची रक्कम मागणी करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडुन संभाजी ब्रिगेड टिमकीडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड टीम छत्रपती संभाजी राजे कनिष्ठ महाविद्यालयाला निवेदन देण्यासाठी गेले असता तिथे धक्कादायक प्रकार निदर्शनास आला कनिष्ठ महाविद्यालय ओसाड ठिकाणी प्राणांगणात सोयाबीनची पेरणी केलेली आबडधोबड बांधलेल्या वर्गखोल्या अकरावी प्रवेश प्रक्रिया चालू असताना एकही विद्यार्थी नाही, एकही वर्ग खोली उघडी नाही,ना विद्यार्थ्यांचा पत्ता ना गुरुजीचा कार्यालय बंद प्राचार्य गायब विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही सौचायलायला ना दार ना वासा वाराजाई भसाभसा सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही नाही महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाही.अशी दूरअवस्था असताना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्राला मान्यता कशी मिळाली हे कोडं न समजण्यासारख आहे.
शासनाच्या शिक्षणविषयक धोरणांची सरळपणे थट्टा करत असल्याचा प्रकार छत्रपती संभाजी राजे कनिष्ठ महाविद्यालयाचा समोर आला आहे, जिथे शिक्षणाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री संस्थाच चालू आहे.एकीकडे अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे सांगतात मग ही प्रवेश प्रक्रिया नेमकी कुठे सुरू आहे? हे कॉलेज खरंच अस्तित्वात आहे की फक्त नावापुरते?
*महाविद्यालयात शेती सुरू — सोयाबीनची पेरणी!*
हे तर अधिक धक्कादायक आहे की कॉलेजच्या परिसरात सध्या शुद्ध शेती सुरू असून, अगदी सध्या सोयाबीनचे पीक पेरण्यात आले आहे.
मग प्रश्न असा — हे शैक्षणिक संस्था आहे की खाजगी शेती प्रकल्प?
*मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न?*
हे महाविद्यालय शहरापासून २–३ किमी अंतरावर निर्जन भागात, शेतांच्या मध्ये आहे.याठिकाणी येणाऱ्या मुलींसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.
उद्या काही अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
10वी–12वी परीक्षा केंद्र कोणाच्या आशीर्वादाने?
या संस्थेत कोणत्याही सुविधा नसताना, इथे दहावी-बारावीचे परीक्षा केंद्र कसे मंजूर झाले? कोणत्या नियमांच्या आधारे? की हे सगळं कोणाच्या आशीर्वादावर सुरू आहे?
सोच्छालय असे की दार न वासा वारा जाई भसाभसा
एक फक्त “Boys Toilet” लिहून झाडाखाली मोकळ्या जागेवर दर्शवलेली भिंत!
कुठेच बांधकाम नाही, सुविधा नाही, दरवाजे नाहीत.
हे शौचालय आहे की भिंतीवर लिहिलेली थट्टा?
एक लोखंडी पत्र्याचा उघडा ढाचा..दार न वासा वारा जाई भसाभसा हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा सरळ अपमान!
हे शिक्षणाचं नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासाचं शोषण आहे.
संभाजी ब्रिगेडने हा सर्व प्रकार म्हणजे एक शिक्षणाच्या नावाने गोरगरीब पालकांची फसवणूक व शासनाच्या यंत्रणेचा अपमान असल्याचे ठणकावून सांगितले असून, लवकरच यावर
जर त्वरित चौकशी करून संबंधित संस्थेवर आणि आधिकार्यांवर कठोर कारवाई झाली नाही.
तर संभाजी ब्रिगेड लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करेल.
शेवटी एकच सवाल:
विद्यार्थ्यांचं भविष्य विकायचं का?
की शिक्षणाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची?
