
म्हणाला; करतेय महायुती सरकार लाज वाटतेय…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धामधील खासदार अमर काळे यांनी भाजप महायुती सरकारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यातील भाजप महायुती सरकार अतिशय असंवेदनशील, असं सरकार आहे. संजय शिरसाट अन् संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्य पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते”, असा घणाघात खासदार अमर काळे यांनी केला.
खासदार अमर काळे म्हणाले, “राज्यातील भाजप (BJP)महायुती सरकार अतिशय असंवेदनशील, असं सरकार आहे. संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते”. दुसरीकडे राज्याचे मंत्री संजय सिरसाट यांच्या घरातील व्हिडीओ जो व्हायरल झाला, त्या बॅगेत नोटांचे बंडल दिसत आहे. एवढ्या नोटा त्यांच्याकडे आल्या कुठून? कोणाच्या होत्या? याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही अमर काळे यांनी केली.
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील व्हायरल झालेल्या बॅगेच्या व्हिडिओतील संपत्तीवरून बोलताना, खासदार काळे म्हणाले, एखाद्या सामान्य थोडीफार अधिकची संपत्ती सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मग हाच न्याय मंत्र्याला का नाही? संजय शिरसाट यांच्या घरामधील रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे. त्या बॅगमध्ये पैसे स्पष्ट दिसत आहे. इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा? कोणाचा आहे? कुठून आला? याची सरकारने दखल घेत तपास केला पाहिजे, अशी मागणी अमर काळे यांनी केली.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार आकाशवाणी निवासस्थानातील कँटीनमध्ये केलेल्या मुक्केबाजीवरून खासदार अमर काळे यांनी राज्य सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचे म्हटले. “ज्यापद्धतीने संजय गायकवाड यांनी कँटीनमध्ये जातं कर्मचाऱ्याला मारहाण केली. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा लाज वाटते. अशा कृतीमुळे लोकप्रतिनिधीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा या निमित्ताने वाईट होतो.
कृती एकाची असते. पण त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. आम्ही लोकांमध्ये वावरतो. संजय गायकवाड यांच्या या कृत्यामुळे आमच्याकडे देखील पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या जबर मारहाणीचा फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल होत असेल, सरकार किती असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय येतो. गृहखातं मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. संजय गायकवाड यांच्यावर थेट गुन्हा दाखल व्हावा’, अशी मागणी अमर काळे यांनी केली.