
बच्चू कडू पहिल्यांदाच स्पष्ट बोलले !
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. तब्बल दोन वर्षांनी सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी त्यांना पाठींबा देणारे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली इतपर्यंत ठीक होते मात्र त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी पुन्हा महायुतीच्या सरकारच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांची सध्या अमरावती ते यवतमाळ अशी यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे.
शिवसेनेत फूट पडली त्यावेळी एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन गोवाहाटीला गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते. त्यांनी त्यावेळी थेट एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठींबा दिला होता. प्रहार संघटनेचे प्रमुख असून त्यांनी शिंदेंना पाठींबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
बटेंगे तो कटेंगे बोलणाऱ्यांनी…
बच्चू कडू हे आपल्या यात्रेत भाजपवर जोरदार टीका करत आहेत. रविवारी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे” बोलणाऱ्यांनी हे नक्की बघा. माळकिन्ही ते गुंज येथील प्रवासात शेख अन्सार भेटले. त्यांनी स्वतःच्या ८ एकर जमीन मंदिराला दान केली आहे. गावखेड्यात सर्व समाज “एक कुटुंब” म्हणून नांदतो, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो.पण दुर्दैवाने काही राजकारणीच या सामाजिक ऐक्याला फोडण्याचे काम करत आहेत, असा टोला लगावला.