
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली आहे. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली असून हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत.
दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषेद घेऊन युतीची घोषणा केली. यावळी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आंबेडकर यांनी तोंडभरुन कौतुक केले.
आंबेडकर यावेळी म्हणाले, शिंदे यांच्या मुख्यमंत्रीदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळण्याची हमी भेटल्याने आपण ही युती केली असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले ?
राज्यात शिवशक्ती-भिमशक्ती ही युती आजची नाही तर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरुवात झालेली युती आहे. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. मी एकनाथ शिंदे यांचं मुद्दाम कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतो आहे कारण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री म्हणून वागले नाहीत तर जनतेच्या सुखदुःखाशी एकरुप होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा या कार्यकर्त्यासोबत देशातील आणि महाराष्ट्रातील प्रचंड मोठा आंबेडकरी समाज हा आजपर्यंत अनेक वर्षे रस्त्यावरील लढाई लढत आला. पण त्याला काही मिळालं नाही.
सध्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला देखील सत्तेचा लाभ मिळावा यासाठी म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं. आज मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेत, मला पूर्ण खात्री आहे की यामुळं महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय जीवन ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही.