
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार ?
राज्याच्या राजकारणातून मोठी बोतमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट ऑफर दिली आहे. फडणवीसांनी त्यांना सत्तेत येण्यासाठी खुली ऑफर दिली. तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे, असे फडणवीस उद्धव ठाकरे यांना म्हणाले.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहेत. फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आमने-सामने आले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट ऑफर दिली. आता याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ आज संपला. याचनिमित्ताने विधानसभेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यानच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘उद्धवजी २०२९ पर्यंत काही स्कोप नाही. आम्हाला विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा इथे स्कोप आहे. याबाबत आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली. सध्या त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधीमंडळात आमने सामने येण्याची ही तिसरी वेळ आहे.
एकदा मुंबईत अधिवेशन सुरू असताना लिफ्टमध्ये ते एकत्र गेले होते. तेव्हा देखील दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना दोघे आमने-सामने आले होते. आता तिसऱ्यांदा मुंबईत अधिवेशन सुरू असताना दोघांची भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या ऑफरमुळे राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याचे बोलले जात आहे.