
दैनिक चालु वार्ता माजलगांव प्रतिनिधि- नाजेर कुरेशी .
माजलगाव तालुक्यात इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात दलालांच्या माध्यमातून कामगार नसतानाही ग्रामसेकाच्या सहीचे
बोगस प्रमाणपत्र सादर करुन जे लोक या क्षेत्रात काम करीत नाहीत त्यांच्या कडून पैसे घेऊन त्यांची कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करतात म्हणून अशा दलालांसहीत योजनेचे लाभ घेणाऱ्या लोकांवर ही शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव शिवाजी कुरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांसाठी इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे त्यातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळावा हा शासनाचा उद्देश आहे मात्र याचा लाभ कामगार नसणारेच घेत असुण खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत म्हणून बीडच्या सरकारी कामगार अधिकारी यांनी माजलगाव तालुक्यातील बनावट कामगारांची तपासणी करून त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.