
पाहा नवीन यादी आली…
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 चा अहवाल आला आहे. त्यात भारताने स्थान 85 व्या स्थानावरुन 77वर स्थानावर पोहचला आहे. ही वाढ सामान्य वाटत असली तर पासपोर्ट इंडेक्समध्ये एक अंकाची वाढ देखील महत्वाची असते.
भारताच्या नागरिकांना आता 59 देशात व्हीसा-फ्री प्रवेशाची सुविधा मिळणार आहे. गेल्या काही वर्षातील ही सामान्य वाढ आहे, परंतू ही जागतिक तुलनेत मोठी झेप मानली जाते.
भारताला व्हीसा-फ्रीवाल्या प्रमुख देशात आता मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव आणि थायलँडचा समावेश आहे तर श्रीलंका, म्यानमार आणि मकाऊ आगमनावर व्हीसा देतो. हे दक्षिण आशियाई आणि आशियान देशांसह भारताचे कूटनितीक नात्यांची मजबूती दर्शवते.
हेनले एण्ड पार्टनर्सचे CEO, डॉ. जुएर्ग स्टीफ़न यांनी सांगितले की, ‘आज पासपोर्ट केवळ प्रवास कागदपत्र नाही तर तुमच्या देशाचे वैश्विक संबंधांचे प्रतीक आहे. अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिक आता वैकल्पिक नागरिकता आणि निवास योजनामध्ये अधिक रस घेत आहेत.
2025 मध्ये चीनची रँकींग देखील उल्लेखनीय आहे. 2015 मध्ये 94व्या स्थानावर होता. चीन 60 व्या स्थानावर पोहचला आहे.ही वाढ युरोपात शेंगेन क्षेत्रात व्हीसा मुक्त पोहच शिवाय मिळवले आहे. याचे श्रेय चीनची आफ्रीका, मध्य आशिया आणि दक्षिण अमेरिकाच्या देशांशी वाढते संबंध दर्शवत आहे.सौदी अरबने देखील चार नवीन व्हीसा फ्री देशांना जोडून 91 देशापर्यंत पोहच वाढवली आहे. जी या वर्षांची सर्वात मोठी वाढ आहे.
ब्रिटनचा 186 व्हीसा फ्री देशाचे स्थान सहा स्थानांवर घसरले आहे. तर अमेरिका 182 व्हीसा फ्री देशांसह 10 स्थानावर पोहचला आहे. ही घसरण अनेक भू राजकीय बदल आणि कठोर इमिग्रेशन कायद्यांचा परिणाम मानला जात आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान सारखा दशे केवळ 25 देशात व्हीसा मुक्त प्रवास करु शकत आहेत. याचा अर्थ जागतिक पासपोर्ट ताकदीत प्रचंड असामानता आहे.
युरोपचे अनेक देश तिसरे आणि चौथे स्थान राखून आहेत. फ्रान्स, जर्मनी, आयरलँड, इटली आणि स्पेन सारख्या देशाचे लोक 189 देशांत व्हीसा फ्री फिरु शकतात. तर ऑस्ट्रीया, बेल्जियम, स्वीडन आणि पोर्तुगाल सारखे देश चौथ्या स्थानावर आहेत.
हेनले इंडेक्स 2025 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापुरचा ठरला आहे,सिंगापूरच्या नागरिकांना 193 देशांत व्हीसा मुक्त प्रवेशाची सुविधा आहे. सिंगापुरने जापान आणि दक्षिण कोरियालामागे टाकत प्रमुख स्थान मिळवले आहे.
महत्वाचे म्हणजे अमेरिका आणि ब्रिटन सारख्या पारंपरिक शक्तीशाली देशांची रँकिंग घसरली आहे.याचा अर्थ जागतिक बदल होत आहेत.
जापान आणि कोरिया हे दोन देश संयुक्त रूपाने दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या नागरिकांना आता 190 देशात व्हीसा-मुक्त प्रवास करता येईल. जागतिक घडामोडीत आशियाचा वरचष्मा वाढत आहे.