
सुट्ट्यांच्या बाबतीत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत त्यांना ३० दिवसांची अतिरिक्त रजा देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी या रजेबद्दल माहिती दिली.
एका वृत्तसंस्थेनुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा नियमांनुसार ३० दिवसांची अर्जित रजा मिळते, जी ते वैयक्तिक कारणांसाठी घेऊ शकतात. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी याविषयी बोलताना, “केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, १९७२ अंतर्गत, केंद्र सरकारी कर्मचाऱ्याला दरवर्षी ३० दिवसांची अर्जित रजा, २० दिवसांची अर्धवेतन रजा, आठ दिवसांची प्रासंगिक रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा मिळण्यास पात्र आहे.”असे म्हटले आहे.
वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी देखील रजा घेऊ शकता
डॉ. जितेंद्र सिंह यांना विचारण्यात आले की, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची काही तरतूद आहे का? याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेऊ शकतात, ज्यामध्ये वृद्ध पालकांची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतील ‘या’ सुविधा
सीजीएचएस अंतर्गत, सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वस्त औषधे आणि उपचार मिळतात. निवृत्तीनंतरही CGHS सुविधेचा लाभ घेता येतो. महिलांना ६ महिने प्रसूती रजा दिली जाते आणि पुरुषांना १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी आणि पीएफची सुविधा मिळते. नवीन पेन्शन योजनेअंतर्गत, दरमहा पगारातून काही पैसे कापले जातात, जे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.
केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे. ते १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची आशा आहे. लेव्हल-१ कर्मचाऱ्यांचा मूळ पगार १८००० रुपयांवरून ५१००० रुपयांपर्यंत वाढू शकतो. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.