
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रा. जिल्हा प्रतिनिधी -विकी जाधव
____________________
ठाणे, दि. ३१ जुलै:
आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून (मध्यान्हनंतर) औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.
या वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कार्यकाळात ठाणे जिल्ह्यातील प्रशासन पारदर्शक ठेवत जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
नवीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे ठाणे जिल्ह्यात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सक्षम व अनुभवसंपन्न अधिकारी म्हणून ओळखले जातात.