
मंगलप्रभात लोढा म्हणाले; कबुतरांची काही…
दादर कबुतर खान्याचा विषय तापत चालला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादर कबुतर खान्यावर कारवाई केली आहे. हा कबुतर खाना बंद केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यास मनाई केली आहे
कबुतरांचा वावर परिसरात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचही म्हटलं आहे. कबुतरांना दाणे, खाद्य देणाऱ्यांविरुद्ध लोकांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. कबुतर खान्याविरोधातील या कारवाईला काही नागरिकांचा विरोध आहे. जैन समाज यावर नाराज आहे. दादर कबूतर खान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध केला. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिकांनी रस्त्यावर उतरत विरोध केला होता.
आता मलबार हिलचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. “मी एका नवीन कबुतर खान्याचं भूमिपूजन केलेलं आहे. तिथे कोणी राहत नाही. तीन दिवसांच्या आत कबुतर खाना तयार होईल” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. “त्याच धर्तीवर मी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलय की, जिथे जिथे मोकळी जागा आहे. नॅशनल पार्क, रेसकोर्स, आरो कॉलनी सर्व ठिकाणी प्रत्येक प्रशासकीय वॉर्डात कमीत कमी एक ओपन स्पेस विकसित करावा. कबुतर नॉन व्हेज घेत नाही. पडलेलं सामान खात नाही. कबुतराची काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यप्रमाणे त्यांना मरु देणार नाही. आमची जबाबदारी आहे” असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.
सरकार मध्यस्थी करण्याचा विचार करतय का?
लोकांना त्रास नको. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जे केलय त्याचं स्वागत आहे. लोकांना आरोग्याचा त्रास नको असा मध्यम मार्ग काढावा लागेल” असं त्यांनी सांगितलं. सरकार मध्यस्थी करण्याचा विचार करतय का? “मी आज चार वाजता भूषण गगराणी साहेबांना भेटणार. त्यात काही झालं नाही तर बघू” दाणे टाकतात म्हणून कबुतरं येतात, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “आरोग्य महत्त्वाच आहे. यात काही दुमत नाही. लोकांचे आरोग्य सर्वात जास्त महत्त्वाच आहे. आरोग्याला संभाळून काही मार्ग काढू शकतो का, ते शक्य आहे म्हणून कमिशनरना भेटणार आहे” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.