
कोथरुड पोलिसांकडून तीन मुलींना मारहाण केल्याचा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपांनी पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत पिडीत मुलींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली.
मात्र 12 तासांपासून अधिककाळ त्यांच्या मागणीची दाद घेतली जात नसल्याचे समोर आहे. याठिकाणी वंचितचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार घेण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले.