
हिंदी भाषेच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र येत मेळावा साजरा केला. त्यामुळे येत्या काळात होत असेलल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू युती करतील अशी चर्चा रंगली आहे.
त्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सोमवारी सकाळी रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यात मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) एकत्र येण्याची काळजी करू नका, योग्यवेळी घोषणा केली जाईल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले असतानाच आता दुसरीकडे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वानाच उत्सुकता लागली आहे.
एकीकडे तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देखील दिल्या, त्यामुळे गेल्या काही दिवसातील घडामोडी पहिल्या तर ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
येत्या काळात मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे वेळ सांगेल? कारण एकीकडे त्यांचे उद्धव ठाकरेंशी बोलणे सुरू आहे, दुसरीकडे आम्ही सुद्धा त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिले आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक पद्धत असते की त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिले पाहिजे. त्यामुळे त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिले आहे, ते कधी येतात याची आम्ही वाट पाहत आहोत. एक, दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आमदार परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भंडारा येथे बोलताना परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, यावर देखील शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणय फुके यांनी जे वक्तव्य केले आहे, ते योग्य नाही, येथे कोणी कोणाचा बाप नाहीये, सगळे समान आहेत, महायुतीमध्ये तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहेत, त्यामुळे कोणी कोणाचा बाप काढू नये, असेही देसाई म्हणाले.