
दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम :-पाथरूड येथील महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) – साई कम्प्युटर अकॅडमी या संस्थेला छत्रपती संभाजीनगर येथे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून विभागीय पुरस्कार मिळाल्यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संस्थेचे चालक उमेश झोळ सर यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काळानुरूप संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेची विशेष दखल घेण्यात आली. “पाथरूडसारख्या ग्रामीण भागातून संगणक शिक्षणात ‘पाथरूड पॅटर्न’ निर्माण केल्याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे,” असे मत ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. चेतन बोराडे, मा. सरपंच शिवाजीराव तिकटे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी आठवले, विभाग प्रमुख गजेंद्र खुणे, राजेंद्र दरंदले, अनिल तिकटे, लिपिक अशोक बोराडे, रामदास घोडके, नागेश पवार, विलास जाधव, हसन तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.