
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-प्रशांत देशमुख
सविस्तर वृत्त “नवभारत हायस्कुल शिवणे चौकात” दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ट्रॅफिक जाम चा सामना कामावर जाणाऱ्या नागरिकांना करावा लागला. या चौकात नेहमीच ट्राफिक जाम होते. शिवणे गावठाणकडून येणाऱ्या रस्त्याला चढ असल्यामुळे गाडी एन डी ए मेन रोडला आणताना कसरत करावी लागते. एखादी गाडी चुकून बंद पडली किंवा टायमिंग चुकले आडवी तिडवी गाडी आली तर ट्राफिक जाम होते.
. आज सकाळी असेच काही झाले व गाड्यांच्या एक ते दीड किलोमीटर रांगा लागल्या. कामावर्ती जाणाऱ्या नागरिकांची गडबड असते त्यामुळे हे प्रकार होतात. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस हजर असून सुद्धा गर्दी आवरणे आवघड जाते. त्यामुळे उपस्थित नागरिकांना प्रतिनिधीने विचारणा केली असता अनेकांनी इथे सिग्नल ची मागणी केली. जी रास्त ही आहे. सिग्नल बसवीला तर ट्राफिक समस्या नियंत्रणाखाली आणता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. दैनिक चालू वार्ता या गोष्टीचा भविष्यात नक्की पाठपुरावा करेल.