
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर
पालघर : महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना त्यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि अपार निष्ठेच्या मान्यतेत विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. हा गौरव त्यांच्या असामान्य शौर्याचे आणि निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक आहे.
देशमुख हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि अतिशय आव्हानात्मक भागात तब्बल दोन वर्षे सहा महिने अवघड परिस्थितीत प्रामाणिकपणे आणि निडरपणे काम करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या धाडसी कारवायांनी नक्षलवादी हिंसाचारावर प्रभावी आळा बसेल, तसेच त्या भागात शांतता आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्यात मोठा वाटा उचलला. या यशस्वी मोहिमांमुळे नक्षल चळवळींना घसराट लागली आणि स्थानिक लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत झाली.
हा सन्मान जाहीर होताच पालघर जिल्हा पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये अभिमानाची लाट दौडली आहे. देशमुख यांच्या सेवाभावाने, धैर्याने आणि कर्तव्यनिष्ठेने जिल्ह्याला आणि राज्याला गौरव मिळवून दिला आहे. त्यांच्या कामगिरीने अनेकांना प्रेरणा दिली असून, भविष्यातही अशाच निष्ठेने आणि धैर्याने सेवा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.