
दैनिक चालु वार्ता म्हसळा – (रायगड)प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या साठी शिक्षण प्रसार देणारे शिक्षण महर्षी डॉ.बापुजी साळुंखे यांनी स्थापित केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे स्थानिक स्कूल चेअरमन समीर बनकर,प्राचार्य डी आर पाटील सर यांच्या विशेष प्रयत्नाने दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने शाळेतील १०८ गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. दातृत्व,मातृत्व आणि कर्तृत्वाचे माध्यमातून विद्यालयाशी निगडीत असणारे समाजसेवक शैलेश कुमार पटेल,नगराध्यक्ष संजय कर्णिक,माजी नगराध्यक्ष असहल कादीरी,माजी नगराध्यक्ष सुनील शेडगे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, समाज सेवक शाहिद उकये,अजय करंबे,सचिव महेश पवार,रेखा धारिया,नाना सावंत,गणेश हेंगिस्टे, किरण पालांडे,केंद्र प्रमुख धर्मा धामणकर यांचे आर्थिक सहकार्यातून विद्यालयातील १०८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात आला.या वेळी चेअरमन समीर बनकर यांनी
गोर गरीब कष्टकऱ्याचे मुलांना शिक्षण देणे कामी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केली त्याचे
धन्यवाद व आभार मानताना विध्यार्थी वर्गाने दानशूर व्यक्तींचे सेवाभावी वृत्तीची आठवण ठेवत उच्च शिक्षित होऊन चांगला आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.गणवेश वाटप कार्यक्रमाला चेअरमन समीर बनकर,प्राचार्य डी.आर.पाटील,नगर पंचायत पर्यटन समिती सभापती राखी करंबे,गण अध्यक्ष नाना सावंत,किरण पालांडे,बाबू शिर्के,गणेश हेंगिस्टे,अजय करंबे,
केंद्र प्रमुख धर्मा धामणकर सर,मुख्याध्यापक नरेश विचारे,मुख्याध्यापक शशिकांत भिंगारदेवे,प्रा.पाटील सर,प्रा.मांजरेकर सर,प्रा.मोरे सर, शिर्के मॅडम, पाटील मॅडम आदी मान्यवर शिक्षकवर्ग विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजीत कार्यक्रमात ग्राम विकास अधिकारी योगेश पाटील यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधील ५ होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी वर्षभर दत्तक घेण्याचे जाहीर केले तसेच प्रयोग शाळेच्या संरक्षण कामी दोन फायर किट देण्याचे जाहीर केले.ग्रामसेवक पाटील यांनी शैक्षणिक उपक्रमात सेवा करण्याची संधी चेअरमन बनकर यांनी उपलब्ध करुन दिली त्या बद्दल त्यांचे कौतुक व आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ.सी.पाटील यांनी तर नीटनेटके सूत्रसंचलन मोरे सरानी केले.