
फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका !
भारत-फिलीपिन्स संयुक्त नौदल सरावानंतर, ब्रिटनमधील फिलीपिन्सचे राजदूत टिओडोरो लोक्सिन ज्युनियर यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले. त्यांनी पाश्चात्य देशांच्या नौदलांना फटकारले. ‘त्यांच्याकडे भारतीय नौदलाइतके धाडस नाही.
कारण भारतीय नौदल जिथे हवे तिथे जाते, असंही त्यांनी म्हटले. टिओडोरो लोक्सिन ज्युनियर हे फिलिपिन्सचे माजी परराष्ट्र मंत्री देखील राहिले आहेत. आणि ते अनेकदा भारत आणि भारतीय सैन्याचे कौतुक करतात.
भारतीय नौदल हे एकमेव नौदल आहे जे आपल्या मनाप्रमाणे जाते. पाश्चात्य नौदल धाडस न करता कास्ट्राटी सारखे गातात,” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका निवेदनात म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्राजवळ भारत आणि फिलीपिन्स यांच्यातील पहिल्या संयुक्त नौदल सरावानंतर हे विधान आले आहे. या सरावाने सागरी जगात भारताची वाढती भूमिका दर्शविली आहे. कारण चीनच्या धोक्यामुळे अनेक देश तिथे जाण्यास घाबरत आहेत.
लोक्सिन यांचे विधान का?
फिलीपिन्स तटरक्षक दलाच्या जहाजाला चिनी जहाजांकडून त्रास दिला जात आहेत. यावेळीच लोक्सिन यांनी हे विधान केले. ही घटना सोमवारी दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोलजवळ घडली. या दरम्यान, चिनी नौदलाच्या युद्धनौके आणि तटरक्षक दलाच्या जहाजात टक्कर झाली. ते फिलीपिन्स तटरक्षक दलाच्या एका बोटीचा पाठलाग करत होते. फिलीपिन्स तटरक्षक दलाचे जहाज बीआरपी सुलुआन मच्छिमारांना मदत आणि पुरवठा करण्यासाठी स्कारबोरो शोलजवळ तैनात होते.
या घटनेनंतर, फिलीपिन्सचे राजदूत म्हणाले, “दक्षिण चीन समुद्रात आपल्या पाण्यात जहाज चालवण्याचा फिलीपिन्सचा दृढनिश्चय पूर्णपणे त्याच्या धैर्यावर अवलंबून आहे. देशाला कोणतेही लष्करी सहयोगी नाहीत – पूर्णपणे शून्य. फक्त भारतीयांकडेच गस्तीत सामील होण्याचे धाडस आहे. ही घटना विचार करण्यास भाग पाडते की जर उत्तर अमेरिका त्याच्या पूर्वीच्या वसाहती, फिलीपिन्सवर स्थानिक लोकांचे नियंत्रण असते तर त्याच्यासोबत उभी राहिली असती का? , असंही ते म्हणाले.