
साने गुरुजींचा व्हिडिओ स्टेटसला ठेवत भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं…
भास्कर जाधव यांनी साने गुरुजींच्या चित्रपटातील वादग्रस्त संवादाचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला.
ब्राह्मण समाजाला डिवचल्याचा आरोप होत असून वाद वाढण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबईतील चाकरमान्यांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजावर टीका केली होती. यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी गुहागर येथील ब्राह्मण साहाय्यक संघाने दिलेल्या पत्राचा उल्लेख करताना, ते पाताळयंत्री, अनाजीपंत… असल्याची टीका केली होती. यानंतर भास्कर जाधव आणि गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघात कलगीतुरा रंगला होता. हा वाद आता संपतो अशी शक्यता निर्माण झाली असतानाच पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजाला डिवचलं आहे. त्यांनी साने गुरुजी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं समुद्रातले आरमार पेशव्यांनी बुडवल्यच्या संवादाचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आहे. यामुळे पुन्हा एकदा यावादाला आता फोडणी लागली असून वाद वाढण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांनी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी एसटी आणि रेल्वे बुकिंग तसेच इतर अडचणींवर चर्चा केली होती. या वेळी गुहागर येथील ब्राह्मण साहाय्यक संघाने दिलेल्या पत्राचा उल्लेख झाल्याने ते चांगलेच भडकले होते. तर गुहागर येथील ब्राह्मण साहाय्यक संघावर हल्लाबोल करताना जोरदार टीका केली होती.
त्यांनी रामदास कदम यांचे नाव घेत माझ्यावर ब्राह्मण समाजाला बोलल्याने अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपींना फोन केले होते. त्याचवेळी ब्राह्मण साहाय्यक संघाने माझ्याविरोधात पत्र दिले होते. त्यामुळे हा ब्राह्मण समाज पाताळीयंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असे त्यांनी म्हटल्याने नवा वाद सुरू झाला.
तसेच जाधव यांनी माफी मागण्यास नकार देताना आपण कोणतेही पाप केलेले नाही किंवा समाजाबद्दल टीका केलेली नाही. भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाला पुढे करून त्यांच्यावर निषेधाचे पत्र लिहायला लावल्याचा दावा देखील जाधव यांनी केला होता. तर “माझ्या भाषणाचा रोख हा गुहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता. जो होता तोच आहे. मी नाही म्हणणार नाहीत, अशी देखील ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.
त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला डिवचणारे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं समुद्रातले आरमार पेशव्यांनी बुडवल्यचा साने गुरुजींचा व्हिडिओ त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आहे. साने गुरुजी चित्रपटीतील संवादाचा तो व्हिडिओ असून त्यात इंग्रज सरकारशी हात मिळवून पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंग्रे यांनी सांभाळून ठेवलेले आरमार समुद्रात बुडलव्याचे म्हटलं आहे. हाच व्हिडिओ भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसला लावले असून ते आता व्हायरल झालं आहे. भास्कर जाधव यांच्या नव्या स्टेट्समुळे ब्राम्हण समाजाच्या विरोधातील नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नुकसात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भास्कर जाधव यांच्या विरोधात मोठी रणनीती आखण्यात आली होती. त्यात त्यांचा निसटता विजय झाला. मात्र यादरम्यान त्यांच्याविरोधात उभे असलेले वंचित आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाला पुढे करून घनशाम जोशी यांना निषेधाचे पत्र लिहायला लावले असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.