
एकटीला पाहून दिवसभर नको ते करायचा !
ती जेव्हा जेव्हा बाथरूममध्ये जायची, तेव्हा भीतीने कापायची, कारण तिच्या पाठोपाठी तिचा सासराही यायचा. आणि मग बाथरूममधल्या सुनेला तो न्याहाळत बसायचा. मात्र एक दिवस तर सासऱ्याने हद्दच केली.
सून घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तिला मागून पकडलं आणि बेडवर ढकललं, त्याने चक्क तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सूनेने बचावासाठी जोरात आराडओरडा केला आणि सासऱ्याला धक्का मारून ती बाहेर पळाली. तिथून तिथने थेट पतीला फोन लावला आणि सासऱ्याटचा घाणेरडा कारनामा सांगितला. त्यानंतर त्या सुनेने पोलिस स्टेशन गाठलं आणि सासऱ्याविरोधात FIR दाखल केली. पोलिसांनी आरेपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हे धक्कादायक हे प्रकरण रामगंज मंडी शहरातील आहे. आरोपी हाँ निवृत्त सैनिक आहे. पीडित सूनेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती 22 वर्षांची आहे . तिचा नवरा जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय तर ती रामगंज मंडीमध्ये सासरच्या घरी राहते. तिची सासू खैराबाद समितीची प्रमुख आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा घराबाहेर असते. तर तिचे सासरे 55 वर्षांचे असून सेनेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते बऱ्याचदा घरीच असत.
काय म्हणाली पीडिता ?
पीडितेने सांगितले- मला माझ्या सासऱ्यांचा बराच काळ त्रास होत होता. कारण त्यांचं घाणेरडं कृत्य होतं. मी जेव्हा जेव्हा बाथरूममध्ये जायचो तेव्हा डोकावून बघत असत. सुरुवातीला मी त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. पण दिवसेंदिवस त्यांची कृत्ये अधिक घाणेरडी होत होती. पण त्याने मला एकटे पाहून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्या मर्यादा ओलांडल्या. मी कशीबशी त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. मग मी तिथून पळून गेले, असं ती म्हणाली.
पोलिसांच्या कारवाईवर कुटुंबीय संतप्त
त्यानंतर सुनेनं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. मात्र, तक्रार दाखल करूनही आरोपींना अटक करण्यात विलंब होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. घटनेनंतर पीडिता तिच्या माहेरी परतली आणि तिथून न्याय मागत राहिली. गेल्या आठवड्यात कुटुंबाने एसडीएमना एक निवेदन सादर करून आरोपीच्या अटकेची मागणी केली होती, असे ते म्हणाले. आरोपीच्या अटकेत होणाऱ्या विलंबामुळे संतप्त झालेल्या पीडितेने आणि तिच्या कुटुंबाने मंगळवारी एसडीएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.