
भारताच्या समस्यांमध्ये मोठी वाढ; पुतिन यांनी थेट…
टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भेट झाली. या भेटीचा मुख्य मुद्दा हा युक्रेन युद्ध होता.
मात्र, भारतावर टॅरिफ लादल्यानंतर रशियाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबत भेट घेतली. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्यानेच भारतावर टॅरिफ लादलाय. याबद्दल बोलताना स्वत: डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारतावर आता तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतिन यांनी फोन केला आणि दोघांमध्ये काहीवेळ चर्चा देखील झाली.
त्यानंतर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार असल्याचे पुढे आले. 15 ऑगस्टला अलास्कामध्ये या दोघांमध्ये भेट झाली. रशियामुळे भारताने अमेरिकेसोबत पंगा घेतलाय. हेच नाही तर अमेरिका दबाव टाकत असताना देखील रशियासोबतचा तेल खरेदीचा करार हा भारताकडून संपवण्यात आला नाहीये. हा अमेरिकेला मोठा झटका भारताने दिला असून त्यांचा अटी मान्य केल्या नाहीत.
रशियासाठी अमेरिकेसोबत भारताने पंगा घेतलेला असतानाच अलास्का येथील भेटीनंतर पुतिन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना मॉस्को भेटीचे निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसमध्ये पुतिन यांना लवकरच भेटू म्हटल्यानंतर पुतिन यांनी थेट म्हटले की, पुढची भेट मॉस्कोमध्ये…यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही आनंदाने प्रतिक्रिया देत म्हटले की, वाह…हे खास आहे…पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
कारण दोन्ही देश या बैठकीच्या अगोदर चेतावणी देताना दिसले. मात्र, प्रत्यक्षात भेटीनंतर एक वेगळेच वातावरण बघायला मिळाले. ज्या भारताने रशियासाठी अमेरिकेसोबत पंगा घेतला ते पुतिन अशाप्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना बोलताना दिसल्याने नेमकं सुरू तरी काय हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात पडलाय. रशियाकडून भारताला धोका तर दिला जात नसल्याचा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय. मात्र, भेटीनंतर युक्रेन युद्धाबाबत दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी भाष्य केले नाहीये. टॅरिफच्या मुद्दावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.