
बैल पोळ्याला खांदे बदलले; येड्यात काढू…
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा या मागणीसाठी ते 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावरील उपसमितीचे अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांना हटवून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, या समितीच्या अध्यक्षपदामध्ये झालेल्या बदलावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘येड्यात काढायचं बंद करा. लोकांना माहिती आहे उपसमिती आधीच स्थापन केलीये. बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका ते ऐकण्यात आम्हाला रस नाही.आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करा. तुम्ही अंमबजावणी केली नाही तर आम्ही मुंबईत येणार.’, असे जरांगे पाटील यांनी ठणकाले.
‘उपसमिती आता गठीत केली आहे का? ती आधीच आहे. हे लोकांना माहिती आहे. आत्ता जे बदल झालेत ते फक्त पोळ्याच्या दिवशी खांदे बदल झाले आहे. पण आमची मागणी काय आहे की मराठी आणि कुणबी एक आहे हा जीआर पाहिजे. तुम्ही हा निर्णय घेण्यासाठी कॅबिनेटच्या बैठक लावा, समितीला बोलवा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
उपसमितीमध्ये 11 मंत्री
मराठा समाजच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारणाबाबत कॅबिनेटच्या मराठा समाज उपसमितीतर्फे शिफारस करण्यात येते.जरांगेंच्या आंदोलनाच्या आधी या समितीची पुनर्रचना करण्यात आली. तसेय कॅबिनेट उपसमितीत एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.