
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————————-
—————————————
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील अप्पर वर्धा धरण सिंभोराकडे जाणाऱ्या बेलोरा येथील वळणावर आज दुपारी झालेल्या मोपेड आणि दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची बातमी पुढे आली आहे
प्राप्त माहितीनुसार बेलोरा रहिवासी युवक महेश चरपे आणि आष्टी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी कर्तव्यावर सहकाऱ्यासोबत जात असताना अचानक या दोन्ही दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली यात मोटरसायकल स्वार महेश चरपे (२५) नामक युवक जागीच ठार झाल्याची माहिती आहे तर मोपेड चालक मते किरकोळ तर मागे बसलेले सहा.पो. निरीक्षक अपघातात जखमी झाले लागलीच आष्टी पोलीसांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांस मोर्शी येथे तर पो. निरीक्षक जोशी यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते अपघातग्रस्त मोटरसायकल क्रमांक एम.एच.सि.क्यू.८९४२ असा असून मोपेड क्रमांक एम. एच.०३ डी. झेड.३०८७ असा आहे या अपघात संदर्भात पुढील कारवाई आष्टी पोलीस स्टेशन करीत आहे