
मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता निघणार…
आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली तरीही मनोज जरांगे पाटील निर्णयावर ठाम
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहे. लाखो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे येणार आहेत. सकाळी १० वाजता ते आंतरवाली सराठीतून निघणार आहे. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार होते. परंतु उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे.
न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केल्यानंतर देखील जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधव येण्यास सुरुवात झाली आहे. आज न्यायालय आंदोलनावरची मनाई कायम ठेवतं ? , की मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी अटी शर्तीसह परवानगी देत? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत. आज सकाळी दहा वाजता ते जालन्यातील अंतरवाली सराटीतून लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना होतील. 29 ऑगस्ट ला सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.
त्यापूर्वी न्यायालयाने त्यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास मनाई केली असली तरी मनोज जरांगे मात्र आझाद मैदानावरतीच आंदोलन करण्यास ठाम आहे. न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल आमचे वकील कोर्टात बाजू मांडतील असा आशावाद जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज न्यायालय आंदोलनावरची मनाई कायम ठेवतं , की मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी अटी शर्तीसह परवानगी देत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान आज सकाळी मराठा बांधव मनोज जरांगे यांच्यासह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत…