
विनोद तावडेंकडून घेतली माहिती…
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत आंदोलन करत आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
आज ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत.
आपल्या मुंबईत दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठा आंदोलनावर लवकरच तोडगा निघेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आज दुपारी अमित शाह हे अंधेरीतील मोगरेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.
अमित शाह हे आपल्या दौऱ्यात लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी गणरायचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत गृहमंत्री शाह हे मराठा आंदोलनाविषयी देखील चर्चा करण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलकांचे हाल
मुंबईत काल रात्री पडलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे हाल झाले. आझाद मैदानात पावसाने चिखल झाला आहे. मुक्कामासाठी आंदोलकांना रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ आली. तसेच शौचालयात पाणी नसल्याने बिसलरीच्या बाटल्या घेऊन जाण्याची वेळ आली असल्याने आंदोलक संतप्त झाले होते.