
ज्याला प्रत्येक मुंबईकर लाडाने म्हणतो…
एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी यांची दहशत होती. अरुण गवळी यांनी प्रत्येक मुंबईकर लाडाने डॅडी म्हणतो… मुंबईच्या दगडी चाळीत राहणाऱ्या अरूण गवळी यांची नुकताच तुरुंगातून सुटका झाली आहे.
17 वर्षांच्या तुरुंगवासा भोगल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर गवळी पुन्हा बाहेर आले आहे. पण तुम्हाला अरुण गवळीच्या गुन्हेगारी कुंडलीबद्दल माहिती आहे का? तर आजा जाणून घेऊ अरुण गवळी यांच्याबद्दल…
कोण आहेत अरुण गवळी?
‘डॅडी’या नावाने ओळखले जाणारे अरुण गवळी मुंबई तील भायखाळा येथील दगडी चाळीतील असं एक नाव आहे, ज्या नावाने मुंबईतील अंडरवर्ल्डला हदरवलं होतं. 17 जुलै 1955 मध्ये महाराष्ट्रातील अमहदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे गवळी यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील गुलाबराव हे एक मजूर होते. आर्थिक अडचणींमुळे गवळी यांनी मॅट्रिकनंतर शिक्षण सोडलं आणि लहान वयातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.
दाऊद इब्राहिमसोबत अरुण गवळी यांची मैत्री…
1980 च्या दशकात अरुण गवळी यांनी रामा नाईकच्या गँगसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ओळख दाऊद इब्राहिम याच्यासोबत झाली आणि त्यानंतर छोटा राजन… तेव्हा दाऊद इब्राहिम याची मुंबईत दहशत होती. गवळीला दाऊदची बेकायदेशीर शस्त्रे आणि ड्रग्जची खेप सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही मैत्री काही काळ टिकली, परंतु लवकरच हे नातं शत्रुत्वात बदललं.
1988 मध्ये अरुण गवळी यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या रामा नाईक यांची हत्या करण्यात आली. येथूनच दाऊत आणि गवळी यांच्यामध्ये वाग निर्माण झाले. वाद इतके टोकाला गेले की, मुंबईतील अंडरवर्ल्ड चर्चेत राहिलं. अशात, दाऊदला धडा शिकवण्यासाठी गवळी यांनी एक मोठं पाऊल उचललं. 26 जुलै 1992 रोजी गवळीच्या चार शूटरनी दाऊदची मोठी बहीण हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर याची मुंबईतील हॉटेलबाहेर गोळ्या घालून हत्या केली. ज्यामुळे दाऊदची बहीण विधवा झाली…
17 वर्ष तुरुंगात होते डॅडी…
3 सप्टेंबर 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2007 च्या एका खून प्रकरणात जामीन मंजूर केला, त्यानंतर 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आणि ते मुंबईतील दगडी चाळ येथे परतले. 76 वर्षीय गवळीच्या सुटकेच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, वकील आणि समर्थक उपस्थित होते.
किती आहे अरुण गवळी यांची नेटवर्थ?
अरुण गवळीयांची संपत्ती मुख्यतः स्थावर मालमत्ता आहे. 2008 मध्ये त्यांची संपत्ती अंदाजे 250 कोटी इतकी होती. ज्यामध्ये दगडी चाळीसह 11 इमारती आहेत… 2025 मध्ये अरुण गवळी यांची संपत्ती 11 कोटी इतकी होती. 2025 मधील नेमके आकडे उपलब्ध नाहीत, परंतु कुटुंबाची संपत्ती 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं मानलं जात आहे.