
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य शासनाने मान्यता दिली. यामध्ये हैदराबाद गॅझेटला प्रामुख्याने मान्यता मिळाली आहे. असे असले तरी या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन केले. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या. यामध्ये हैदराबाद गॅझेट ही एक प्रमुख मागणी होती. ती मान्य झाल्याने आंदोलक खुष आहेत.
असे असले तरीही कुणबी जातीच्या दाखल्यासाठी मराठा समाजाच्या मार्गात नवे अडथळे येण्याची शक्यता आहे. केवळ हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद असल्याने काम सोपे होणार नाही. या नोंदी बरोबरच विविध कागदपत्रांची आणि पुराव्यांचे आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातील नागरिकांना या अडचणी येऊ शकतात.
राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून हैदराबाद गॅझेटवरून जो ‘जीआर’ काढला. त्यावरून मराठा समाज ओबीसी झाला, असं जरांगे पाटील यांनी सांगित. मात्र या निर्णयानुसार ज्यांची कागदोपत्री कुणबी नोंद आहे, त्यांनाच कुणबी जातीचा दाखला मिळणार आहे.
त्याच मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल, असं ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बाबनकुळेंनी म्हटले आहे. मंत्री बाबांकडे यांच्या स्पष्टीकरणामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात अशी स्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने पुरावे महत्त्वाचे असतील.
मराठा समाजाला कुणबी जातीच्या दाखल्यासाठी पुरावा म्हणून वंशावळ नोंद आवश्यक आहेच, हेही मंत्री बाबनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तर ज्या हैदराबाद गॅझेटचा दाखलाजरांगे पाटील देत आहेत त्या गॅझेटमध्ये तालुक्यानुसार व्यवसाय आणि जातीसंदर्भातली आकडेवारी आहे.
या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारचा हा जीआर जरांगे पाटील यांना फसवणारा असल्याचे म्हटले आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने निजामकालीन आणि जुन्या महसूल कागदपत्रांची तपासणी करून ५८ लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत.
मराठा अभ्यासक विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या नोंदींवरून सुमारे दोन लाख ३९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु, ही नोंद असणे हेच कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्रतेचे निकष आहेत. मंत्री बाबनकुळे यांनीही हेच स्पष्ट केले आहे. यावरून मराठा समाजात असलेला गोंधळ आणि निराशा स्पष्ट होते. या विषयावरून राजकीय चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत.