
आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं…
प्रत्येक जण ज्या कंपनीत काम करत असतो, तिथे सुट्टी घेताना काहीना काही अटी या असतातच. कधी आपण सुट्टी मागितली तर लगेच मिळते आणि कधीकधी मात्र एखाद्या कारणाने आपली सुट्टी नाकारली देखील जाते.
मात्र, काही कंपन्या अशा आहेत, जिथे सुट्टी मागितली की नकारच मिळतो. अशाच एका कंपनीला तिच्या कर्मचाऱ्याने वेगळ्याच अंदाजात धडा शिकवला आहे. या तरुणाने असं काही केलं की, आता सगळेच या कंपनीला नावे ठेवत आहेत.
एका तरुणाने आपल्या भावाच्या लग्नासाठी कंपनीत सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, त्याला सुट्टी नाकारण्यात आली. यामुळे चिडलेल्या या कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याची माहिती सगळ्यांना दिली आहे. या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर या घटनेबद्दल पोस्ट लिहीत संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याने पोस्टमध्ये दावा केला आहे की, त्याच्या भावाचे लग्न अमेरिकेत असल्याने त्याने सुट्टी मागितली होती, मात्र त्यांनी रजा देण्यास नकार दिल्याने आपल्याला नोकरी सोडावी लागली.
त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तीन आठवड्यांपूर्वी १५ दिवसांच्या रजेसाठी त्याने कंपनीकडे अर्ज केला होता, परंतु कंपनीने त्याला लग्नाला उपस्थित राहणे किंवा राजीनामा देणे यापैकी एक निवडण्यास सांगितले. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीने राजीनामा देणे योग्य मानले. पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले की त्याच्यावर कोणतीही मोठी आर्थिक जबाबदारी नाही आणि राहण्याची कोणतीही समस्या नाही. तथापि, त्याने तरीही रेडिट वापरकर्त्यांना विचारले की त्याचा निर्णय योग्य आहे की नाही? त्याने असा दावा केला की त्याने सुट्ट्यांची संख्या कमी करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आहे.
या व्यक्तीने सांगितले की, तो गेल्या ४ वर्षांपासून या कंपनीत काम करत होता आणि गरजेपेक्षा जास्त काम करत होता. त्याला त्याच्या कामानुसार चांगला पगारही मिळत नव्हता. आता तो दुसरी नोकरी न शोधता कंपनी सोडून गेला आहे. कंपनीने त्याला नोटीस कालावधी पूर्ण करण्यास सांगितले आणि धमकीही दिली असा आरोपही त्याने केला.
नेटकऱ्यांनी काय म्हटले?
आता त्या माणसाच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक रेडिट वापरकर्त्यांनी त्याचे समर्थन केले आहे आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा त्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही करिअरपेक्षा कुटुंबाची निवड केली. तुमच्या कंपनीने तुम्हाला फक्त एक साधन म्हणून पाहिले. तुम्ही अशी कंपनी सोडून देऊन योग्य निर्णय घेतला’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुमचे काम कधीही कुटुंबापुढे मोठे नाही. भविष्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी काम सोडल्याबद्दल अजिबात दोषी वाटून घेऊ नका.