
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका !
मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अधिक चिघळल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका या युद्धामध्ये मध्यस्थी करत होती. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. या युद्धामध्ये मध्यस्थी करण्यामागे अमेरिकेचा मोठा कट होता.
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा शांततेचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचा दावा सातत्याने अमेरिकेकडून केला जात असून रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकला जात आहे. मात्र, आता या युद्धाबाबत धक्कादायक माहिती पुढे आलीये. रविवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील मंत्री परिषदेच्या इमारतीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला केला. ज्यानंतर मोठे नुकसान झाले.
रशियाच्या निशाण्यावर जेलेंस्की यांचे मंत्री असल्याचाही दावा केला जातोय. या हल्ल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न लगेचच केला. या इमारतीत मंत्र्यांची निवासस्थाने आणि कार्यालये दोन्ही आहेत. रशियाच्या या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच 18 जणे गंभीर जखमी झाली आहेत. आता रशियाच्या हल्ल्यावर युक्रेन काय प्रतिउत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या हल्ल्यात थेट मंत्र्याला टार्गेट करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
रशियाने कीवच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे टाकली. रशियाच्या या हल्ल्यातून हे स्पष्ट होताना दिसत आहे की, जेलेंस्की यांचे मंत्री देखील रशियाच्या निशाण्यावर आहेत. रविवारी, गेल्या दोन आठवड्यांतील कीववर दुसरा सर्वात मोठा हल्ला झाला. डार्निटस्की येथील एका निवासी इमारतीला आग लागली. एकीकडे शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतला जात आहे तर दुसरीकडे मात्र हल्ले होताना दिसत आहेत.
एका अमेरिकेन कंपनीला देखील रशियाकडून मागच्या हल्ल्यात टार्गेट करण्यात आले होते. ज्यानंतर अमेरिकेने संताप व्यक्त केला. आता रशियाकडून युक्रेनच्या सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे. युक्रेनने देखील रशियाच्या परमाणू ठिकाणांना टार्गेट केले होते. युद्ध थांबण्याचे सोडून आता चिघळताना दिसत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारताला खेचण्याचे काम अमेरिकेकडून केले जात आहे. मात्र, भारताने अगोदरच आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.