
भारत एका झटक्यात भरून काढणार टॅरिफचे नुकसान; 135 अरब डॉलरचा व्यापार झिरो कर…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. अमेरिकेतून भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावले जात आहे.
भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लावल्याचे स्पष्ट सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ लगेचच काढू असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झालाय.
भारताने देखील हे नुकसान भरून काढण्यासाठी पाऊले उचलली आहेत. आता भारत असा निर्णय घेणार आहे की, ज्यामुळे होणारे नुकसान आरामात भरून निघणार आहे. भारताला कोणत्याही टॅरिफशिवाय 135 अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याची मोठी संधी मिळणार आहे. यावर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होऊ शकतो. हा अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासाच म्हणावा लागेल.
रिपोर्टनुसार, भारत आणि युरोपियन युनियन पुढील महिन्यात त्यांच्या महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला (FTA) लवकरच अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन महत्त्वाच्या दोन बैठका घेतील. यादरम्यान नियम, बाजारपेठ प्रवेश, वाइन आणि दुग्धजन्य पदार्थांवरील शुल्क या क्षेत्रातील मतभेद दूर होतील. जर यावर एकमत झाले तर या वर्षी करार पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि यामधून मोठा फायदा आणि टॅरिफचे होणारे नुकसान भरून निघेल.
युरोपियन कमिशनच्या आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन आणि व्यापार प्रमुख मारोस सेफकोविक हे भारताच्या दाैऱ्यावर असणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस एफटीएवर सह्या दोन्ही बाजूंनी केल्या जातील. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे काही क्षेत्रामध्ये मोठे नुकसान झाले असून व्यापारी चिंतेत आहेत. मात्र, आता यातून मार्ग काढण्यासाठी भारताने मोठा प्लन केला असून भारताने हे दाखवून दिले की, काहीही झाले तरीही आम्ही तुमच्यासमोर हात पसरवणार नाहीत. यासोबतच अमेरिकेचा दबाव असताना देखील भारताने काही महत्वाचे करार हे रशियासोबत केली आहेत.