
कोणत्याही जीआरच्या…
मराठा आरक्षणावर आज (दि. ९) राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. मराठा आंदोलकांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली जाणार आहे, तसेच मराठा आंदोलकांवर दाखल असणारे गुन्हे मागे घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांबरोबर चर्चा होईल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
कोणत्याही शासकीय अधिनियमाच्या (जीआर) अंमलबजावणीसाठी वेळ लागतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जीआरची अंमलबजावणी सुरु
१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्यापूर्वी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. याबाबत बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शासनाने मराठा आरक्षणाच्या मागणीवर काढलेल्या जीआरची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात आज मंत्रीमंडळ बैठकीतही चर्चा झाली. आता प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे, तसेच मराठा आंदोलकांवर दाखल असणारे गुन्हे मागे घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांबरोबर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.