
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आर्वी :- शहरात कॉंग्रेस पक्षातर्फे ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्या स्वागताचा शुभेच्छा समारोह पार पडला या आयोजनाच्या माध्यमातून आर्वी विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेस नेते सोमराज तेलखेडे, तालुका अध्यक्ष सचिन दहाट, शहर अध्यक्ष महेन्द्र मात्रे व जिल्हा महासचिव रवींद्र खंडारे यांच्याकडून ईद शुभेच्छा संदेश देण्यात आला कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी समितीचे शैलेश अग्रवाल यांनी मुस्लीम बांधवांना इस्लामिक आचरण पद्धतीनुसार या पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.ते संबोधनातून माहिती देतांना म्हणाले की, मुस्लिम मान्यतेनुसार मुहम्मद पैगंबर यांचा जन्म आणि मृत्यु दोन्ही याच दिवशी येतात. पैगंबरांचा जन्म मक्का येथे झाला होता व मान्यतेनुसार त्यांचे निधनही याच दिवशी झाले. म्हणून, याला “बरा वफत” म्हणतात – ‘बरा’ म्हणजे तारीख आणि ‘वफत’ म्हणजे मृत्यु. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी, मुस्लिम समाजाच्या लोकांकडून मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणी आणि आदर्शांचे स्मरण आणि त्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा करण्यात येते. या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज पठण केले जाते, कुराण पठण केले जाते आणि दुरुद शरीफ पाठवले जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात, ज्यामध्ये मुस्लिम पैगंबरांचे जीवन आणि त्यांचा एकता आणि प्रेमाचा संदेश देखाव्यांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करतात. मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीनुसार जो दान धर्म करतो, दया भाव मनी बाळगतो, कुठल्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्यांची मदत करतो, जकात देतो, कुणालाही त्रास देत नाही तो मुसलमान आहे. जो अमानत मध्ये खयानत आणतो, दुसऱ्यांना त्रास देतो, दुसऱ्यांचा हक्क बळकावण्याचा प्रयत्न करतो व खोटं बोलतो तो अच्छा इन्सान नाही आणि मोहम्मद पैगंबरांच्या दृष्टीने “जो अच्छा इन्सान नही वो सच्चा मुसलमान नही” मोहम्मद पैगंबर या विचारांचे पाईक असल्यामुळे फक्त मुस्लीम समाजासाठी नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी आदर्श असल्याचे आपण मानत असल्याचे मत यावेळी शैलेश अग्रवाल यांनी प्रकट केले.
शुभेच्छा संदेश देतांनी रवींद्र खंडारे यांनी सांगितले की विश्वाच्या पाठीवर मुस्लीम देशांना वगळता भारत एकटाच सर्वसमावेशक देश आहे जिथे मोहम्मद पैगंबरांच्या प्रकटदिनी राष्ट्रीय सुटी देण्यात येत असून सार्वजनिक दृष्ट्या जलसे काढून सर्वच समाजाचे लोकं मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबी च्या शुभेच्छा देतात आणि या माध्यमातून हा सन संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. देशातील राष्ट्रीय सणांप्रमाणेच या सनात लोकांचा सहभाग एकमेकांप्रतीचा प्रेम व आदरभाव प्रकट करतो. मुस्लीम देशांना वगळता या सणाला हे स्वरूप फक्त भारतातच पाहायला मिळते. शुभेच्छा संदेश देतांनी सचिन दहाट म्हणाले की ईद-ए-मिलाद-उन-नबी ला मौलिद किंवा १२ वफत देखील म्हणतात. हा सण रबी-उल-अव्वलच्या १२ व्या तारखेला साजरा केला जातो, जो इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना आहे, जो पैगंबर मोहम्मद साहेबांचा वाढदिवस म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून ईद-ए-मिलाद-उन-नबीचे मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.महेन्द्र मात्रे यांनी सांगितले की, पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्म आणि त्यांच्या जीवनातील महान कामगिरीचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी, मुस्लिम त्यांचे आदर्श आणि शिकवण स्वीकारण्याची आणि त्यांच्या जीवनातील उदाहरणापासून प्रेरणा घेण्याची प्रतिज्ञा करतात. इस्लामिक इतिहासात, हा दिवस प्रेम, एकता आणि आध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक मानला जातो, जो जगभरातील मुस्लिमांना एकत्र करतो. सोमराज तेलखेडे यांनी शुभेच्छापर संदेशातून सांगितले की, मुस्लिम हा दिवस आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करतात, कारण या दिवशी पैगंबर मुहम्मद यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या पैगंबरत्वाची सुरुवात देखील याच दिवशी मानली जाते. पर्शियन भाषेत “मिलाद” म्हणजे जन्म. म्हणून, ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणजे पैगंबरांच्या वाढदिवसाचा उत्सव, जो जगभरातील मुस्लिम मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरा करतात.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय गहलोत, रुपेश लांडगे, सागर वाघमारे, प्यारू अली, बब्बू अली, लकी छान्गानी, पांडुरंग मलिये, कैलाश काळपांडे, वसंत मंडवे, शैलेश तलवारे, शेख नईम, शेख बब्बू, निलेश मात्रे, राहुल काळे, शेख महेमूद, शेख इस्माईल, मुझफ्फर सौदागर व इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.