
अभिषेकचे ताट पाहून चढला पारा; वाचा काय घडले…
मागील काही दिवसांपासून बच्चन कुटुंबिय चांगलेच चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन हा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही.
हेच नाही तर ही देखील चर्चा रंगताना दिसली की, ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती आपल्या आईच्या घरी शिफ्ट झाली. मात्र, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या ही अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या यांच्यासोबत विदेशात जाताना दिसली. यामुळे खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्यात वाद आणि की, घटस्फोटाची चर्चा फक्त अफवा हे कळू शकले नाही. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी भाष्य करणे टाळले.
आता नुकताच बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. शेफ हरपाल सिंह सोखी यांनी एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला. त्यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन यांनी माझ्यासमोर थेट अभिषेक बच्चनला चांगलेच सुनावले होते आणि हॉटेलमध्ये अभिषेकवर संताप व्यक्त केला होता. अभिषेक बच्चन याच्याबद्दलचा किस्सा सांगताना हरपाल म्हणाले की, आमचे एक इंडियन रेस्टारंट होते पख्तून तिथे अमिताभ बच्चन कायमच जेवणासाठी येत.
एकदा अमिताभ बच्चन हे जया यांना न घेऊन येता अभिषेक आणि श्वेता यांना घेऊन आले होते. मला आताही आठवते की, जेवणानंतर अभिषेक याच्या ताटात अन्न शिल्लक राहिले होते. त्यानंतर अमिताभ यांनी अभिषेकला चांगलेच ओरडले. त्यांनी म्हटले की, अभिषेक ताटातील सर्व संपव..मला तुझ्या ताटातील अन्न पूर्ण संपलेले दिसले पाहिजे. अभिषेक म्हणाला की, नाही..माझे पोट भरले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, मग तू घेतले का?
यासोबच शेफ हरपाल यांनी अजूनही काही बॉलिवूड स्टारचे किस्से सांगितले. त्यांनी म्हटले की, श्रीदेवी या बरेच दिवस आमच्या हॉटेलमध्ये राहण्यास होत्या. मात्र, त्यांनी कधीच आमच्या येथून जेवण घेतले नाहीत. त्या नेहमीच बाहेरून जेवण मागवत फक्त कधी घेतला तर राईस आणि दाल फक्त त्या आमच्या हॉटेलमधून घेत. काही दिवसांपूर्वीच लाफर शेफमध्ये हरपाल हे दिसले होते.