
शरद पवारांचा ‘देवाभाऊं’ना इशारा !
नाशिमध्ये आज (दि. १५) राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार शरद पवार यांनी मोर्चाला संबोधित करत भाषण केल.
यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या आजूबाजूला पाहा काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा सल्ला दिला.
‘नेपाळमध्ये गेल्या ८ दिवसात काय घडलंय ते पाहा राज्यकर्ते गेले. एक भगिनी आली. तिच्या हातात राज्य दिलं गेलं. अजून काय झालं त्याच्या खोलात जात नाही. मात्र शहाणपणा हा शिकण्याचं काम हे देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशी आशा व्यक्त करतो. असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.