
भारतात काय होणार ?
गेल्या काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही निर्णय घेतलेले आहेत, ज्याचा भारतासह इतरही राष्ट्रांना मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे मीच शांतीदूत आहे, असा दावा करत ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यासह इतरही अनेक युद्ध थांबवल्याचा दावा केलेला आहे.
डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील हे सांगता येत नाही. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. त्यांनी चीनच्या एका बड्या कंपनीसोबत महत्त्वाची डिल केली आहे. त्यामुळे आता भारतातही काही निर्णय घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला?
अमेरिका आणि चीन या दोन देशांत टिकटॉक (TikTok) या सोशल मीडियाबद्दल बराच वाद चालू आहे. मा त्र आता हा वाद संपवण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी अमेरिकेत टिकटॉक चालूच राहील यावर सहमती दाखवली आहे. टिकटॉकची कंपनी आणि अमेरिका सरकार यांच्यात एक महत्त्वाचा करार झाल्याचे बोलले जात आहे. या कराराला शुक्रवारी (19 सप्टेंबर) डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे प्रमुख श्री जिनपिंग यांच्या भेटीत अंतिम स्वरुप दिले जाईल. टिकटॉक अमेरिकेत चालू राहणार असले तरी हा करार करताना अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे, असे अमेरिकेने सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील अमेरिकेतील युवकांना ही कंपनी वाचावी असे वाटत होते. या कंपनीबाबतही एक करार झाला आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेत दिले आहेत.
नेमका वाद काय होता?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेल्या एका कायद्यामुळे अमेरिका आणि टिकटॉकमध्ये वाद चालू होता. या कायद्यात चीनचे कोणतेही अॅप अमेरिकेत बंद करण्याचा अधिकार असल्याची तरतूद करण्यात आली होती. याच तरतुदीनुसार अमेरिकेने बाइटडांस या कंपनीच्या टिकटॉक या अॅपवर 19 जानेवारी 2025 रोजी बंदी घातली होती. ही बंदी घालण्यात आलेली असली तरी अजूनही हे अॅप अमेरिकेत चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने आतापर्यंत अनेकवेळा या टिकटॉक अॅप बंद करण्याच्या तारखेत बद केला आहे. आता ही शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 होती. त्याआधीच बाइटडांस आणि अमेरिकेत एक करार होणार आहे. या करारानुसार टिकटॉक चालू ठेवण्यासाठी बाइटडांस या कंपनीला ते अॅप अमेरिकेतली एखाद्या माणसाला विकावे लागणार आहे.
भारत असा निर्णय घेणार का?
दरम्यान, अमेरिका आणि बाइटडांस या कंपनीत हा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता असताना आता भारताची चर्चा रंगू लागली आहे. भारतात टिकटॉक या अॅपवर बंदी आहे. त्यामुळे अमेरिकेत हा करार होत असताना भारत अशा प्रकारचा एखादा करार करायचा विचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.