
पुणे: शहरातूनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागानेअचानकछापा टाकत कारवाई करण्यातआली आहे . यात कोहिनर गृपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रसत्यावरील आयसीसी टॉवर मधील कार्यालयात आणि सिंध सोसायटी मधील घरी छापा टाकण्यात आला आहे . तर मित्तल गृपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आलाय.
सध्यायाकारवाईमागीलनेमकंकारणअद्यापकळूशकलेलंनाही, मात्रयाधडककारवाईनेअनेकचर्चेलाउधाणआलंआहे. दरम्यान, तपासाअंतीयाकारवाईचेसत्यकळूशकणारआहे.
विशेष म्हणजे, मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पासंदर्भात ईडीने मित्तल ब्रदर्स ग्रुपची यापूर्वी चौकशी केली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात महारेराच्या निर्देशानंतर ही अलीकडील कारवाई करण्यात आली असल्याचीमाहितीआहे. ज्यामध्ये वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पाचे प्रवर्तक असलेल्या ऑनेस्ट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून सुमारे 90 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. फ्लॅट्सचा विलंबित ताबा देण्याबाबतच्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन करण्यात कंपनीने अपयशी ठरल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता.
वाकड येथील नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर लैंगिक अत्याचार
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या एका नामांकित मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत सुरक्षा रक्षक महिलेवरती तिच्याच सहकारी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केलेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार हा वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पती सोबत एका खाजगी सुरक्षा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. या सुरक्षा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेले मनोज धोंडीराम कदम या 45 वर्षीय व्यक्तीने महिला काम करत असताना तिच्या सहकाऱ्याला बाजूला करून त्याने तिला मिलेनियम मॉलच्या एका खोलीत घेऊन जात तुला कोणती पोस्टींग पाहिजे, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने पीडित महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील कृती केले. याला महिलेने विरोध करत मनोज कदम याला मारहाण ही केली. मात्र त्याने विरोध झुगारून या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांत मनोज कदम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351 (2) , 351 ( 3 ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.