
CM फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीतच दिली धक्कादायक माहिती…
महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सराफ यांच्या राजीनाम्याची माहिती दिली.
महाराष्ट्र सरकारची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजू मांडण्यांची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी सराफ यांच्यावर होती.
वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सराफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवले. दरम्यान, पुढील व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांनी त्यांना काम पाहण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सराफ आता जानेवारी महिन्यापर्यंत काम पाहणार आहेत. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.