शिक्रापुर प्रतिनिधि -प्रफुल्ल गायकवाड़
पाबळ येथे ०९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेली “पाबळ प्रीमियम लीग – गाव चॅम्पियन 2025-26” क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा श्री भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब, पाबळ यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत पाबळ गावातील सहा वार्ड वाईज संघांनी सहभाग घेतला होता. फुल पीच क्रिकेट पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला.
या वर्षी चौधरी पाटील स्पोर्ट्स क्लब संघाने आपले वर्चस्व कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत गाव चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. सलग तीन वर्ष विजय मिळवून या संघाने स्पर्धेच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
स्पर्धेचे निकाल
🥇 प्रथम विजेता – चौधरी पाटील स्पोर्ट्स क्लब
👉 (संघमालक : संतोष शेठ चौधरी पाटील)
🥈 द्वितीय विजेता – द बॉस 11 लायन्स
👉 (संघमालक : सलीम भाई इनामदार, प्रताप दादा पिंगळे)
🥉 तृतीय विजेता – भैरवनाथ सुपर किंग
👉 (संघमालक : अजय दादा बगाटे, निलेश दादा बगाटे)
🏅 चतुर्थ क्रमांक – वेताळबाबा 11
👉 (संघमालक : सोपानराव जाधव पाटील)
बक्षीस वितरण समारंभासाठी पाबळगावचे विद्यमान सरपंच व विद्यमान अध्यक्ष श्री. सोपानराव जाधव पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई बगाटे, दीपक दादा खैरे (सरपंच, ग्रामपंचायत हिवरे), माजी उपसरपंच संजय चौधरी तसेच नवनाथ चौधरी, संदीप चौधरी, कुमार चौधरी, शंतनु जाधव, अनिकेत जाधव व ऋषिकेश गुप्ता . अमोल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग तिसऱ्या वर्षी गाव चॅम्पियन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून श्री भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब, पाबळ यांनी गावातील क्रीडा चळवळीला नवे बळ दिले असून आयोजकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
