प्रतिनिधी सोमनाथ काळे
दिनांक २० जानेवारी रोजी बजाज पुणे ग्रँड टूरच्या स्टेज वन शर्यतीदरम्यान सायकलपटूंच्या गटाच्या मध्यभागी एक अपघात झाला. मोठ्या संख्येने सायकलपटू असलेल्या रोड सायकलिंग शर्यतींमध्ये असे अपघात होणे अगदीच सामान्य आहे.
नियमानुसार, शर्यत २३ मिनिटांसाठी थांबवण्यात आली. अपघात झालेल्या सायकलपटूंना वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रथमोपचार दिले. तसेच त्यांना सायकली बदलण्याची परवानगी देण्यात आली.
घडलेल्या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही.
शर्यतीच्या अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती अत्यंत सुयोग्य आणि वेगवान पद्धतीने हाताळली. अपघात झालेले जास्तीत जास्त सायकलपटू पुन्हा शर्यतीत सामील होऊन ती पूर्ण करू शकले.
अपघात झालेल्या ३ सायकलपटूंपैकी मलेशिया राष्ट्रीय संघाचा क्रमांक १६१ असलेला अब्दुल हलील मोहम्मद इझ्झात हा फक्त एक सायकलपटू शर्यत पूर्ण करू शकला नाही. उर्वरित दोघांनी अपघातानंतर सायकल बदलून शर्यत पूर्ण केली. ज्यामध्ये सायकलपटू क्रमांक १९१ एन्झो फुएंटेस कॅपारोली आणि सायकलपटू क्रमांक १९५ मार्टी रिएरा कॅसानोवास यांचा समावेश आहे.
