दैनिक चालू वार्ता पंढरपूर प्रतिनिधी-सुधीर आंद
पंढरपूर : राजेश्री कोळी हिच्या हस्ते अनुसुचित जात प्रवर्गाचे चिठ्ठीद्वारे आरक्षण काढताना निवडणूक निर्णय अधिकारी रणजित मोरे व आदी.
पंढरपूर
तुंगत ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर 2022 अखेर संपत आहे. मतदार यादी नोंद व हरकती पूर्ण झाल्या आहेत. पाच प्रभागामधून 13 उमेदवार निवडले जाणार आहेत. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी रणजित मोरे यांनी वाॅर्डनिहाय आरक्षण सोडत जाहिर केली.
यामध्ये प्रभाग क्र. 1 साठी – सर्वसाधारण स्ञी – 1, अनुसुचित जाती माfहला – 1, सर्वसाधारण – 1, प्रभाग क्र 2 साठी – सर्वसाधारण स्ञी – 1, सर्वसाधारण स्ञी – 1, सर्वसाधारण – 1, प्रभाग क्र – 3 साठी – अनुसुचित जाती – 1, सर्वसाधारण – 1, प्रभाग क्रं – 4 साठी – सर्वसाधारण स्ञी – 1, सर्वसाधारण – 1, प्रभाग क्र – 5 साठी – सर्वसाधारण स्ञी – 1, सर्वसाधारण स्ञी – 1, सर्वसाधारण – 1 असे आरक्षण सोडत जाहिर झाले आहे. अनुसुचित जात प्रवर्गं मिहला 1 जागेचे आरक्षण 1 व 3 प्रभागासाठी होते. राजेश्री कोळी हिच्या हस्ते चिठ्ठीद्वारे प्रभाग एकसाठी काढण्यात आले.
यावेळी उपसरपंच सौ.वैशाली लामकाने, ग्रामसेवक एस.एच.चेंडगे, तलाठी महेश बडके, ग्रा.स.सौ.आरती रणदिवे, अलका लोहार, औदुंबर गायकवाड, कृषी सहाय्यक शिवाजी चव्हाण, शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, ताज मुलाणी, शिवाजी रणदिवे, पोपट आंद, नवनाथ रणदिवे, ग्रा.कर्मचारी तानाजी वाघमारे, तलाठी कर्मचारी प्रविण जाधव आदी उपस्थित होते
