दैनिक चालु वार्ता भोर प्रतिनिधी- जीवन सोनवणे
भोर:भोरच्या अतीव दुर्गम व दऱ्या-खोऱ्यातील दिव्यांग नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व दिव्यांगांना विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी भाटघर जलाशयाच्या किनारी असलेल्या पसुरे येथे भव्य दिव्य स्वरूपात दिव्यांग जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदरील मेळाव्यात दिव्यांग नागरिकांना त्यांचे हक्क व कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व त्यांचेकडून विविध योजनांसाठी फॉर्म भरून घेतले गेले…
या मेळाव्यात तब्बल ६० दिव्यांग नागरिकांनी सहभाग घेतला होता.या मेळाव्यात श्री.मार्तंड देवसंस्थान, जेजुरी निर्मित श्री. मल्हार दिनदर्शिकेचे मान्यवरांचे शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले व सर्व नागरिकांना दिनदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात आले.
श्री. मानसिंग धुमाळ उपसभापती भोर,श्री. प्रसाद शिंदे-अध्यक्ष,जेजुरी देवसंस्थान,श्री. बाबासाहेब जगताप-कार्याध्यक्ष प्रहार अपंग संघटना पुणे जिल्हा,श्री.बापुसाहेब कुडले-अध्यक्ष प्रहार संघटना, भोर,श्री. रामचंद्र धुमाळ-चेअरमन विकास सोसायटी,श्री.सुरेशनाना धुमाळ-मा.सदस्य ग्रा.पं.पसुरे,श्री. रामचंद्र सणस-मा.व्हा.चेअरमन विकास सोसायटी,श्री.दत्तात्रेय धानवले- अध्यक्ष-आदिवासी महादेव कोळी समाज भोर,श्री. उत्तम देशमुख,श्री.शिवाजी बदक,आदी मान्यवर उपस्थित होते.
तर मेळावा यशस्वी होण्यासाठी भोर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने विशेष सहकार्य केले आहे व श्री.अमित प्र.धुमाळ,श्री.गणेश वि. धुमाळ,श्री.बाबू जाधव,श्री.प्रवीण कांबळे,श्री.दिपक कांबळे,कु.प्रणव बांदल इत्यादी युवकांनी मेहनत घेतली.
“समाजातील उपेक्षित घटकाची सेवा करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा मेवा हेच या मेळाव्याचे फलित होय तर दिव्यांगांचे कोणी तरी आपली आपुलकीने दखल घेतंय हे शब्द कार्य सिद्धीस गेल्याचे प्रमाणपत्र होय।
