दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी : देगलूर येथेआज रोजी “महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे” अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील साधना हायस्कुल व मानव्य विकास विद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वतःच्या संरक्षना बाबत तसेच वाहतुकीच्या नियमाबाबत आणि विविध कायद्याबाबत देगलूर पोलीस स्टेशनचे सोहम माछरे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे त्यावेळी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी व पालक वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.
