दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
भारतीय जनता पक्षाच्या लोहा तालुका ग्रामीण सचिव पदी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते माधव पाटील पवार पारडीकर यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवडीचे पत्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते माधव पाटील पवार यांना देण्यात आले.
यावेळी भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष आनंदा पाटील शिंदे, पं.स. व बाजार समितीचे माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके ,युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
